Popular Posts

Monday, March 16, 2015

राशिभविष्य - To १५ ते २१ मार्च २०१५

राशिभविष्य - To १५ ते २१ मार्च २०१५
मेष
उत्तम मार्ग सापडेल भरकटलेल्या मनाला स्वत:चे अस्तित्व नसते. ते अनेक मनांची ओझी घेऊन फिरत असते. असाच काहीसा प्रकार या काळात अनुभवास येईल. गुरू, राहू आणि शनी यांच्या अशुभ योगात आपल्याला बुध आणि शुक्र यांचा खंबीर आधार लाभणार आहे. मंगळ, हर्षल यांच्या कुरापती जरी चालू राहिल्या तरी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यातून उत्तम मार्ग काढू शकाल. आरोग्य, वाहणे याबाबत योग्य काळजी घ्यावी. धार्मिक प्रवृत्ती वाढेल. सिनेनाटय़ क्षेत्रातील लोकांना प्रसिद्धीचे वलय शोधत येईल. नवीन वर्षांचे आगमन उत्साही प्रेरणादायी ठरेल. दिनांक- १५, १८, १९ शुभ काळ महिलांना : प्रसंगावधान दाखवाल, कला साहित्य क्षेत्रात विशेष यश.
वृषभ
व्यवहार जपून करावेत खऱ्या मनाच्या सामर्थ्यांमध्ये आत्मसुख आणि शांती ही दोन मूल्ये वसलेली असतात. या सामर्थ्यांपुढे बलदंड अविचारही नतमस्तक होतो. अशा निरागस तत्त्वशील राशीच्या सहवासात गुरू, शनीची साथ खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर रवी, मंगळ, हर्षल यांच्या घाईगर्दीत होणारे आर्थिक, मानसिक व्यवहार जपून करावेत. तर व्ययस्थानातील शुक्रामुळे उधळपट्टीपासून दूर राहावे. मंगळ गुरूचा नवपंचम योग धार्मिक कार्यातील सहभाग खूप मोलाचा ठरेल. तर जुने मित्र, नातेवाईक यांच्या गाठीभेटीतला आनंद लहानपणाच्या आठवणींना उजाळा देईल. दिनांक : १६, १७, १८ शुभ काळ. महिलांना : संयमाने हाताळलेल्या घटनांचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन
समस्यावर उपाय मिळेल अधिक स्पष्टता, निर्भीडपणा त्यामुळे या राशीत एक वेगळे वैश्विक चैतन्य आढळते. बुध आणि शुक्र यांच्या सहयोगाचा फायदा या आठवडय़ात या राशीला होणार आहे. जरी शनी, राहू मंगळ शत्रुत्वाच्या भूमिकेत असले तरीही यांच्या समस्यांवर उपाय सापडून यांना उत्तम संरक्षण लाभणार आहे. आपल्यापाशी असलेल्या दूरदर्शीपणाचा उपयोग करा. सामाजिक कार्यात, राजकारणात आपला प्रभाव वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. संयम, सावधानता या गोष्टी हिताच्या ठरतील. दशम स्थानातील रवी एखादी उत्तम संधी आणून देईल. नव्या वर्षांच्या आगमनाचे आनंदाने स्वागत करा. दिनांक : १५, १८, १९ शुभ काळ. महिलांना : सामंजस्याने प्रश्न सोडवा. संयम, सावधानता या गोष्टी हिताच्या ठरतील.
कर्क
वर्चस्व वाढेल आपल्या राशीत स्थानापन्न झालेला गुरू खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्र, शनी, रवी हे ग्रहसुद्धा आपल्या मदतीला उभे आहेत. अशा मंगलमय स्थितीत एक वेगळय़ाच आनंदोत्सवाने नव्या वर्षांची सुरुवात होत आहे. सामाजिक कार्यात, राजकारणात मानसन्मानाचे योग येतील. प्रवासातील परिचयाचे मैत्रीत रूपांतर होईल. विशेषत: आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. नवे विचार, नव्या कल्पना उद्योगधंद्यात कामी येतील. दिनांक : १५, १६, १७, २०, २१ शुभ काळ. महिलांना : धार्मिक, सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजना, नवीन कामे यांना उत्तम प्रोत्साहन मिळेल.
सिंह
जीवनशैलीत फरक पडेल आपल्या चतुर्थातला शनी आणि अष्टमातील रवी, मंगळ, हर्षल, केतू हे सारे ग्रह शत्रूपक्षात बसले आहेत अशा वेळी काही पथ्ये पाळली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होण्यास मदत होईल. विशेषत: वेळेचे बंधन पाळणे. यशस्वी, सकारात्मक वागण्या बोलणाऱ्यांच्या संपर्कात रहाणे. जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून कामाचा उरक कसा होईल याकडे लक्ष देणे. अशा साध्या सोप्या गोष्टी रोजच्या जीवनात अवलंबल्यास आपल्या जीवनशैलीत बराच फरक पडेल. शुक्र बुधाचे सहकार्य खूप मोलाचे ठरेल. त्याची लाभलेली साथ तुम्हाला खूप दिलासा देईल. नवीन वर्षांचे स्वागत आनंदाने करा. दिनांक : १५, १८, १९ शुभ काळ. महिलांना : प्रवासाचे योग येतील, वृद्ध माणसाच्या आरोग्याची काळजी घ्या. मन स्थिर ठेवा.
कन्या
बुद्धिमत्तेचे कौतुक होईल स्वराशीत राहू, अकरावा गुरू, तृतीय स्थानात शनी एकूण ग्रहाचे उत्तम सहकार्य आपल्याला आठवडय़ाच्या सुरुवातीला लाभदायक ठरत आहे. पण सप्तमातील रवी, मंगळ, हर्षल, केतू याच्या बिकट अवस्थेतून बाहेर पडताना काहीसा मनस्ताप गैरसमज यांना स्वीकारून पुढे जावे लागेल. विशेषत: आपल्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील. नोकरी उद्योगधंद्यात बुधाचे उत्तम साह्य लाभेल. खरं तर आपली नवीन वर्षांची सुरुवात खूप चांगली होत आहे. दिनांक : १६, १७, २०, २१ शुभ काळ. महिलांना : कामातील यशामुळे आनंद मिळेल. खाण्यापिण्यात पथ्य पाळा. जबाबदारीने वागा.
तूळ
योग्य निर्णय घ्या साडेसातीचे शेवटचे पर्व चालू आहे. बारावा राहू व चतुर्थात बुध त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत आपला प्रवास चालू राहील. उद्योगधंद्याच्या बाबतीत काळजीपूर्वक वागा. महत्त्वाचे निर्णय घेताना आर्थिक लाभापेक्षा धंद्यातील पुढच्या वाटचालींवर लक्ष ठेवून निर्णय घ्या. सरकारी कामात सतर्क राहा. प्रवासात वाहन, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. संयम व शांततेने अडचणींवर मात करा. साडेसातीसाठी मारुती उपासना उत्तम मानसिक बळ देईल. नव्या वर्षांच्या स्वागताला आनंदाने पुढे जा. दिनांक : १५, १८, १९ शुभकाळ महिलांना : मानसिक दडपणाखाली राहू नका. मोकळेपणाने विचार करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यात विशेष समाधान लाभेल.
वृश्‍चिक
समस्या सोप्या होतील निसर्गाच्या जवळ जाणे; साधे राहणे; स्वत:ची कामे स्वत: करणे, भरपूर चालणे, जीवनात जगण्याच्या नव्या कल्पना शोधणारी शोधक वृत्ती या राशीपाशी प्रामुख्याने असते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ही माणसे आनंदाने जगू शकतात. राहू आणि गुरू यांच्यातील स्थितप्रज्ञता यांच्या या जगण्याला खूप मदत करते. खूपशा मार्गावर असलेल्या उद्योगधंद्यातील योजना पूर्णत्वाकडे पोहोचतील. परिश्रम आणि सत्याची कास आपल्या सोबत असल्यामुळे समस्याही सोप्या होतील. साडेसातीच्या काळात मारुती उपासना आनंद देईल. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी उत्साह घेऊन येईल. दिनांक : १६, १७, १८, २०, २१ शुभ काळ. महिलांना : आरोग्य जपा, घाईगर्दीतही मनस्वास्थ्य चांगले राहील. वाढत्या कामातही आनंद लाभेल.
धनु
संघर्ष मिटेल संघर्ष, वादग्रस्तता आणि प्रतिकूल परिस्थितीत माणूस कसा जगतो त्यावर त्याचे मोठेपण सिद्ध होत असते अशीच काहीशी परिस्थिती या राशीच्या बाबतीत अनुभवास येते. शनी साडेसातीची नुकतीच सुरुवात त्यात गुरूचा पूर्ण असहकार अशा वेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यास या राशीला फारसा त्रास पडणार नाही. बुध-शुक्राचा उत्तम सहकार आणि राहूचा दशमातील पितृतुल्य आधार यातून सर्व काही नीटनेटके होण्याची परिस्थिती निर्माण होईल. उद्योगधंद्यातील व्यवहार, मैत्री यात फार सावधतेने वागा. गैरफायदा घेणाऱ्यांपासून सावध राहा. येणारे नवीन वर्ष संघर्षांतही आनंद स्थिरता देणारे असेल. दिनांक : १८, १९, २० शुभ काळ. महिलांना : धार्मिक कार्यात आनंद मिळेल, समस्यांमधून मार्ग निघतील.
मकर
मानसिक समाधान लाभेल समस्या पुढे आल्या की, आपण फक्त पराभवाचाच विचार करीत असतो आणि यशापासून फार दूर जातो, पण समस्येचे रूपांतर जर अनुभवात केले तर तीच समस्या आपल्या यशाला एक नवी दिशा देते. मकर या कष्टाळू राशीची मन:स्थिती नेहमी द्विधा आणि अस्थिरतेकडे झुकत असते, पण आता मात्र या राशीची ग्रहस्थिती खूप चांगली आहे. गुरू, शनी, राहू यांचे उत्तम सहकार्य आणि शुक्र-बुधाची उत्तम साथ त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना खूपच चांगले मानसिक समाधान लाभेल. उद्योग-धंद्यात सुचलेल्या कल्पना प्रत्यक्ष स्वरूपात उतरताना दिसतील. उत्साहाने जोमाने नव्या वर्षांचे स्वागत करा. दिनांक : १९, २०, २१ शुभकाळ महिलांना : धार्मिक कार्यात आनंद मिळेल, परिश्रमाचे चीज होईल.
कुंभ
मनाची पारदर्शकता वाढेल आपल्या समृद्ध मनापाशी खूप काही देण्याची ताकद असते, पण त्या गोष्टीचा आपण कधी विचारच करीत नाही. वादविवाद, संकटे, अपराध, वैषम्य, दुर्दम्य अशा शब्दांच्या श्रंखलात आपण स्वत:ला अडकवून घेत असतो. सकारात्मकता, सद्भावना, सत्य, चिंतन यांतून एक वेगळीच सात्विकता जन्मास येते त्यातून मनाची पारदर्शकता वाढते. आपल्या राशीच्या विरोधात गुरू-राहू उभे आहेत, पण शुक्राच्या रात्री सामर्थ्यांपुढे बऱ्याच चांगल्या गोष्टींची पूर्तता होईल. उद्योग-धंद्यात, नोकरीत चिंतेचे सावट दूर होईल. नव्या वर्षांची नवीन सुरुवात मंगलमय ठरेल. दिनांक : १५, १६, १७, १८ शुभ काळ. महिलांना : समाजसेवेची संधी लाभेल. घरात धार्मिक कार्ये होतील.
मीन
वैभव प्राप्त होईल गुरूचा उत्तम आशीर्वाद, शनीचे सहकार्य आणि स्वराशीतील रवी, मंगळ एकूण ग्रहांची उत्तम बैठक जमली आहे. त्यामुळे होणाऱ्या शुभ घटनांचे परिणाम नोकरी-धंद्यात कोर्टकचेरी निकालात ठळकपणे दिसून येतील. तुमच्यामधील चांगले विचार करण्याची ताकद जशी वाढेल. तसा तुमच्यातला आनंद, वैभव, मानसिक उन्नती यांच्यात सकारात्मक बदल होईल. चांगले मन चांगले विचार देते. चांगला सहवास चांगली स्पंदने निर्माण करतो. व्यवसायात तुमच्यामधील सात्विकता, सचोटी तुम्हाला हात धरून पुढे नेईल. अशा उत्तम काळात नव्या वर्षांचे स्वागत करा. दिनांक : १६, १७, १८ शुभकाळ महिलांना : घरात आनंदी वातावरण निर्माण होईल, आरोग्य चांगले राहील, समाजसेवेची उत्तम संधी लाभेल.